पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खेड तालुक्यातील पाळू गावावर शोककळा पसरली आहे. २८ ऑगस्ट रोजी हीटरचा शॉक लागून गरम पाणी अंगावर सांडल्याने ८० टक्के भाजलेल्या अश्विनीने ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर
अखेर आज तिने अखेरचा श्वास घेतला. एका
शेतकरी कुटुंबातून येऊन, जिद्दीने यश
मिळवलेल्या या होतकरू विद्यार्थिनीच्या
अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काय घडले नेमके?
अश्विनी केदारी हिचा २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी हा दुर्दैवी अपघात झाला. ती अभ्यासासाठीलवकर उठली होती. अंघोळीसाठी पाणी गरम करत असताना, पाणी किती तापले आहे हे पाहण्यासाठीती बाथरूममध्ये गेली. त्याचवेळी हीटरचा शॉक लागल्याने उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. याभीषण घटनेत ती ८० टक्के भाजली होती. तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वा पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
स्वप्न अधुरे राहिले
अश्विनीने २०२३ च्या MPSC PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक
पटकावला होता. तिलाजिल्हाधिकारी
(Collector) होण्याचे मोठे स्वप्न होते. तिने त्या दिशेने जोरदार तयारी सुरू केली होती. तिच्या
उपचारासाठी येणाऱ्या खर्चासाठी खेड तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार
घेऊन आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
अनेकांनी मदतही केली, पण नियतीच्या क्रूर
खेळापुढे सर्वप्रयत्न व्यर्थ ठरले. अश्विनीचा मृत्यू झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांकडूनही हळहळव्यक्त केली जात आहे. तिचे कलेक्टर होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
एका होतकरू आणि यशस्वीविद्यार्थिनीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळत
आहे. अश्विनीचे यश हे अनेक ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान होते. तिच्या
निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातआहे.

0 Comments